top of page

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा!

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचा देखील राजीनामा दिला आहे. पक्षाच्या एका विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर देखील काँग्रेसच्या माजी नेत्या असा उल्लेख करण्यात आला आहे.

ree

सुष्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी सकाळी एक पत्र पाठवलं आहे. आपल्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावं, अशी विनंती देखील सुष्मिता देव यांनी केली आहे. आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे. तसेच, पक्षातील इतर सदस्यांचे, नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहे.

“भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत गेल्या तीन दशकांचा माझा प्रवास मला कायम लक्षात राहील. या निमित्ताने मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. माझ्या या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होतात”, असं आपल्या पत्रात नमूद करत त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे वैयक्तिकरीत्या आभार मानले आहेत. हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता”, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page