top of page

.... थेट मुख्यमंत्र्यांच्याच घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांच्या निवासस्थानावर रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. पेट्रोलने भरलेली पहिली बाटली घराच्या पुढच्या भागावर फेकली तर दुसरी बाटली घराच्या मागील बाजूस फेकली गेली होती. या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही.

ree

मेघालयमध्ये आत्मसमर्पण करणारा एक दहशतवादी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. या घटनेनंतर मेघालयमध्ये काल जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तणावाचं वातावरण असून शिलाँगमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर चार जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधा ४८ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. चेरिस्टल फिल थांक्यू या दहशतवाद्याचा १३ ऑगस्टला पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाचं दफन झाल्यानंतर ही हिंसा भडकली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मेघालयचे गृहमंत्री लहकमान रिंबुई यांनी राजीनामा दिला आहे.


 
 
 

Comments


bottom of page