top of page

देवेंद्रजी सॉरी, तुमचं…

पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पार पडला.

ree

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. रुढ पद्धतीप्रमाणे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांची नाव घेताना देवेंद्र फडणवीसांचा विसर पडल्याचं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांची माफी मागितली. ते म्हणाले, “देवेंद्रजी, सॉरी, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आणि आमचे सहकारी देवेंद्रजी... ” असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.


 
 
 

Comments


bottom of page