top of page

राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण

मुंबई: दक्षिणेपासून मध्य प्रदेशच्या दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असून हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

ree

गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. राज्यातील पावसाळी वातावरण आणि मेघगर्जनेसह पाऊस आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोल्हापूर,सांगली,सोलापूर,नांदेड,बीड,लातूर, उस्मानाबाद ,अकोला, सिंधुदुर्घ ,धुळे , नाशिक, पुणे, नगर,सातारा , आणि संपूर्ण विदर्भात पुन्हा पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे व शुक्रवार राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल असा देखील अंदाज आहे


गेल्या दोन दिवसांत मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान 36 अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी उकाडा सहन करावा लागणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page