top of page

Video- अमरनाथमध्ये ढगफुटी: १५ जणांचा मृत्यू; ४० जण बेपत्ता; मदत-बचाव कार्य सुरू

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळाजवळ शुक्रवारी सायंकाळी ढगफुटी झाली. यात १५ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता असून त्यावेळी गुहेजवळ १० ते १५ हजार भाविक उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. हवाई दलाच्या वतीने मदत आणि बचाव कार्य करण्यात येत आहे.

ree

अमरनाथ गुहेपासून एक - दोन किलोमीटरच्या परिसरात ढगफुटी झाली होती. डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले सुमारे २५ तंबू आणि दोन ते तीन लंगर वाहून गेले. अनेक यात्रेकरू बेपत्ता असून जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेल्याची भीती आहे. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन तळावरील काही तंबू, प्रसादालयांचे नुकसान झाले असून तेथे बचाव मदतकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान तसेच इंडोतिबेटियन सीमा पोलीस आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. या तळावरील काही तंबू, प्रसादालयांचे नुकसान झाले असून तेथे बचाव मदतकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुहेजवळ अडकलेल्या प्रवाशांना पंचतरणीला नेण्यात आले.


 
 
 

Comments


bottom of page