top of page

लग्न होत नसल्याने तरुणाची आत्महत्या

जळगाव : लग्नाचे वय निघून चालले तरी मुलगी मिळत नसल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात ही घटना घडली आहे. तरुण चेतन खरोटे (वय ३०) असं या तरुणाचं नाव आहे.

चेतन खरोटे हा गेल्या काही दिवसांपासून लग्न होत नसल्याने चिंतेत होता. तो आईकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावीत होता. याच कारणाने चेतन गेल्या तीन दिवसांपासून व्यसनाच्या जास्त आहारी गेला होता. यामुळे चेतनची आई देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. ही संधी साधत चेतनने घर आतून बंद करून घेतले आणि गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. बराच वेळ झाला तरी घरातून कुणी बाहेर येत नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय बळावला. त्यांनी त्यांच्या आईला माहिती दिली. तेव्हा घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता चेतनने आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


Comments


bottom of page