top of page

चरणमाळ घाटात बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

नंदुरबार: जिल्ह्यातील चरणमाळ घाटात खासगी बसचा शनिवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चालकासह एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून ८ ते १० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नवापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये जवळ्पास ३० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ree

अपघातग्रस्त खासगी लक्झरी बस महाराष्ट्रातून गुजरातकडे निघाली होती. नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. त्यानंतर बसमधील प्रवाशांनी आक्रोश सुरू केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. हा अपघात झाला त्यावेळेस मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. या अपघातात ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


 
 
 

Comments


bottom of page