top of page

... यापुढे तिकीट तपासण्याचं काम करायचं नाही

शनिवारी मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मिराबाई चानूला एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. मिराबाई चानू सध्या भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस (टीसी) म्हणून काम करत असून तिला नव्या नोकरीचीही ऑफर दिली आहे.

ree

एन बिरेन सिंग यांनी मिराबाई चानू रौप्यपदक पटकाविल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. “यापुढे तू रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करायची गरज नाही, मी तुमच्यासाठी एक विशेष पोस्ट राखीव ठेवत आहेत,” असं मुख्यमंत्री मिराबाई चानूला व्हिडीओत सांगत असल्याचे दिसत आहे.


 
 
 

Comments


bottom of page