top of page

चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार

चंद्रपूर : शहरातील मध्यभागी असलेल्या रघुवंशी व्यापार संकुलात बुरखाधारी युवकाने भर दुपारी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात आकाश अंदेवार हा युवक जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. भर दिवस घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. परिसर सील करून तपास सुरू केला. या घटनास्थळी रिकामी काडतुसे आणि लेडीज हँडबॅग आढळून आली.


 
 
 

Comments


bottom of page