top of page

‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटाची कमाई समोर आली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे. तसेच जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.



Comments


bottom of page