top of page

६० विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; ८ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना इतर ६० मुलींचा व्हिडिओ बनवला आणि तो तिने एका मुलाला पाठविला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा विद्यापीठ परिसरात ठिय्या आंदोलन केले.

ree

मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना ६० विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. ही विद्यार्थिनी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवत होती आणि तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा. सोशल मीडियावर एका विद्यार्थिनीने व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनतर ८ विद्यार्थिनींना याचा मोठा धक्का बसला आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यापीठाच्या गेट क्रमांक २ वर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला असून शेकडो विद्यार्थी इथं जमून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिस आल्यानंतर व कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थिनी शांत झाल्या.

सध्या आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटली असून वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनानं इतर विद्यार्थिनींसमोर तिची चौकशी केली. विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत विद्यार्थिनीनं सांगितलं की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमला येथील ​​रहिवासी आहे. मात्र, अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल किंवा अटक करण्यात आलेली नाहीय.




 
 
 

Comments


bottom of page