top of page

चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी “मला माजी मंत्री म्हणून नका, दोन दिवसांत बघा काय होतंय”, अशा आशयाचं सूचक विधान केलं होतं. त्यावरून बरीच राजकीय चर्चा आणि तर्क वितर्क झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

“चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे, की त्यांनी चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा”, असं चाकणकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “केंद्रातील भाजपा सरकार महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे पैसे देत नाही. निदान चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावल्यामुळे सरकारचा भार हलका होईल, असं रुपाली चाकणकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page