top of page

स्वयंपाकावरून वाद; सुनेने सासूचा गळा आवळून केला खून

स्वयंपाक बनवण्याच्या किरकोळ कारणावरून सासू आणि सुनेचा वाद झाला. या वादातून सुनेने सासूचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री चाकण येथे घडली. सुषमा अशोक मुळे (वय- ७१) असं सासूचे नाव असून सुवर्णा सागर मुळे (वय- ३२) असं सुनेचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी सुनेला अटक केली आहे.

ree

सुषमा आणि सुवर्णा यांच्यात नेहमी भांडण व्हायचं. सुवर्णाचा पती कामावर गेल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा स्वयंपाक बनवण्यावरून दोघींमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सुनेनं चक्क नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध झाल्या. सासू बेशुद्ध झाल्याच पाहून सुवर्णाने पतीला फोन करून बोलावून घेतलं, मुलाने तातडीने आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता सूनेने गुन्ह्याची कबुली दिली.


 
 
 

Comments


bottom of page