top of page

सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या यासाठीच्या सर्व सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंगळवारी सांगितले. राज्यभरात २२६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.


प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. तर, अभ्यासक्रम निहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.


Comments


bottom of page