top of page

सीबीआयला पिंजऱ्यातील पोपट म्हणत मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले ‘हे’ आदेश

मद्रास: सीबीआय भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या हातातील बाहूलं बनल्याचा आरोप अनेक वर्षांपासून विरोधक करत आहेत. असं असलं तरी सीबीआय ही सीएजी प्रमाणे सारखी फक्त संसदेला उत्तरदायी असणारी संस्था असावी, असं मत मद्रास उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सीबीआयला पिंजऱ्यातील पोपट म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या पोपटाला म्हणजेच सीबीआयला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ही संसदेला अहवाल देणारी एकमेव स्वायत्त संस्था असावी, असं न्यायालयानं मंगळवारी म्हटलंय.

ree

न्यायालयाने म्हटलं की, या एजन्सीला जेव्हा वैधानिक दर्जा दिला जाईल तेव्हाच ती स्वायत्त असेल. शिवाय न्यायालयाने केंद्र सरकारला सीबीआयला अधिक अधिकार देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याबाबत विचार करण्याचा आणि निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये सीबीआयने अनेक विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यामुळे सीबीआय भाजपच्या नियंत्रणात असल्याचा आरोप होत आहे.


 
 
 

Comments


bottom of page