top of page

इजिप्त : चर्चला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये चर्चला लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला तर ५५ जण जखमी झाले आहेत. इंबाबाच्या वर्दळीच्या भागात असलेल्या अबू सेफीन चर्चला रविवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत चर्चचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी पाच हजार लोक जमले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.


 
 
 

Comments


bottom of page