top of page

कोरोनामुळे मृत्यू; वारसांना नुकसान भरपाई देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेश

नवी दिल्लीः कोरोनामुळे कित्येक रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या`रुग्णांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती. त्यावर केंद्राने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही असे म्हटले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात या याचिकेवर आज ( बुधवारी ) मोठा निर्णय दिला. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी ६ आठवड्यांच्या आत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला.

ree

कोर्टाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली नाही, परंतु ही रक्कम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे निश्चित केली जाईल असे सांगितले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाईची किती रक्कम देण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टाने ६ आठवड्यांच्या आत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणं हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम १२ नुसार 'सवलतीच्या किमान मानदंडांचा' एक भाग असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यू आणि त्याचे कारण नमूद करावे. कुटुंबीय समाधानी नसल्यास मृत्युचे कारण सुधारण्यासाठी यंत्रणाही असावी, असं कोर्टाने म्हटलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page