top of page

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघात...

Sep 5, 2024
1 min read

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. अशातच गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरनं अचानक ब्रेक मारल्यामुळे प्रवाशांनी फुल भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या. हा अपघात कशेडी घाटात झाला. बसमधील सर्व 80 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.



तसेच, बाजूनं जाणारा दुचाकीस्वारही थोडक्यात बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



 
 
 

Comments


bottom of page