top of page

पीएमपीएमएल बसखाली चिरडून ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे : पीएमपीएमएल बसखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाला. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे महिला काही अंतर फरफटत गेली. बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात पद्मा पंढरीनाथ गायकवाड या ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. ही महिला रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. पुण्यातील विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात हा प्रकार घडला.

ree

पद्मा गायकवाड रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या पीएमपीएलएम बसच्या मागील चाकाखाली त्या आल्या होत्या. त्यानंतर बससोबत काही अंतर त्या फरफटत गेल्या. त्यामुळे जागीच त्यांचा करुण अंत झाला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या प्रकरणी संबंधित पीएमपीएमएल बसचा चालक आणि वाहक या दोघांना बससह विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


 
 
 

Comments


bottom of page