top of page

... अखेर सांगलीच्या झरे गावात बैलगाडी शर्यत पार पडली

सांगली : गोपीचंद पडळकर आयोजित बैलगाडी शर्यतीला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बैलगाडी शर्यतीच्या आयोजनावरुन मोठं राजकारण रंगलेलं होतं. दोन ते तीन दिवसांपासून सांगलीच्या झरे गावात आणि सगळ्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बैलगाडी शर्यत होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र पडळकर समर्थकांनी मोठ्या शिताफीने पोलिसांना आणि प्रशासनाला गुंगारा देत सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बैलगाडी शर्यत पार पाडली आहे.

ree

एका रात्रीत दुसरा ट्रॅक

पडळकर यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला शर्यतीसाठी ट्रॅक उभारण्यात आला होता. मात्र याचा सुगावा लागताच पोलिसांनी ट्रॅक उध्वस्त केला होता. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पडळकर समर्थकांनी तिथूनच पाच किमी अंतरावर दुसरा ट्रॅक मध्यरात्रीच्या सुमारास केला आणि सकाळी साडे पाच वाजता ही स्पर्धा पार पडली. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडी चालक आणि मालक सहभागी झाले होते. स्पर्धेनंतर पडळकर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.



 
 
 

Comments


bottom of page