top of page

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर...

गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या अपघातात तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहेे. अपघातग्रस्त बस चालवणाऱ्या चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात ३० टक्क्यांहून अधिक अल्कोहोल आढळले आहे. त्यामुळ बसचालक मद्यधुंद असल्याने हा अपघात तर झाला नाही ना?, असा संशय व्यक्त होत आहे.

ree

समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ १ जुलै रोजी खासगी बसचा भीषण अपघात झाला. ही बस पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. यानंतर लगेचच बसने पेट घेतला. हा अपघात घडताच ड्रायव्हर आणि कंडक्टरसह ५ ते ६ प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. यामुळे या भीषण अपघातातून ते बचावले. मात्र, इतर २५ जणांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. यानंतर आता याप्रकरणी सर्वात मोठा खुलासा झाला आहे.

१ जुलैच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला होता. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने दुसऱ्या दिवशी दुपारी बसचालकाच्या रक्ताचे नमुने घेतले होते. त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तात अल्कोहोलचे प्रमाण कमी झाले असावे. अपघात घडला त्यावेळेस ड्रायव्हरच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



 
 
 

Comments


bottom of page