VIDEO: जळगाव - तीन मजली इमारत कोसळली...
- Mahannewsonline

- Sep 21, 2021
- 1 min read
पावसामुळे एक तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पाच वर्षांपूर्वीच ही इमारत बांधण्यात आली होती. इमारतीमधील रहिवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. ही इमारत कोसळतानाचा धक्कादायक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, इमारत कोसळण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात सदर इमारत होती. मुंबईस्थित साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा शहरात गुंतवणूक म्हणून सदर तीन मजली इमारत पाच वर्षांपूर्वी बांधली होती. मात्र इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले होते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता भाडेकरुंनी सदर इमारत अगोदरच रिकामी करुन घेतली होती. सोमवारी, दि. २० सप्टेंबरच्या रात्री सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे ही इमारत अखेर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.. केवळ १८ सेकंदात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. याबाबत माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत या इमारत कोसळल्याचीच चर्चा गावात रंगली होती.





















Comments