top of page

ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांनी एसटीवर बोलू नये”

एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या प्रकरणी माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे हे उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांना आता एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही.

एसटी कामगारांच्या हिताची जपणूक महाविकास आघाडीने केलेली आहे. परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करत आहेत. लवकरच मार्ग निघेल. आमचीही परिवहन मंत्र्यांशी चर्चा चालू आहे.




 
 
 

Comments


bottom of page