top of page

लग्नानंतर नववधू सासरी निघाली अन् अर्ध्या वाटेतच....

लग्न झाल्यानंतर सासरी निघालेली नवरी अर्ध्या वाटेतूनच प्रियकराचा हात पकडून फरार झाल्याची खळबळजनक प्रकार घडला. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये हा प्रकार घडला आहे. यानंतर वऱ्हाडींनी नववधू बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत त्या नववधूला शोधून जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी तिने १८ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच स्वत:च्या मर्जीने प्रियकरासोबत गेल्याचे म्हटले.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, सतना येथील तरुणीचे लग्न उत्तर प्रदेशमधील बांदा येथील तरुणाशी ठरले होते. १३ डिसेंबरला दोघांचे लग्न झाले, त्यानंतर तिला सासरी पाठविण्यात आले. जेव्हा कारमध्ये बसून ती सासरी जात होती, तेव्हा रस्त्यात एक तरुण स्कूटरवरून कार समोर आडवा आला. त्याने कुऱ्हा़ड दाखवून कार थांबवायला लावली नववधूला कारमधून उतरवून तो तिला घेऊन पसार झाला. लग्नाचे ठिकाण या घटनास्थळापासून अर्धा किमीवरच होते. यानंतर नववधूच्या पित्याने पोलिसांत जाऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.


 
 
 

Comments


bottom of page