top of page

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट; १०० जणांचा मृत्यू!

अफगाणिस्तानच्या उत्तरी कुंदुंज प्रांतात आज (शुक्रवार) मशिदीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १०० जणांचा मृत्यू झाला व अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एएफपीने याबाबत वृत्त दिले आहे. अमेरिकन सैन्याने देश सोडल्यापासून झालेल्या आता पर्यंतच्या हल्ल्यांमधील हा एक मोठा हल्ला आहे.

उत्तरी कुंदुज प्रांतामधील सय्यद अबाद मशीदत स्थानिक नागरिक शुक्रवारीच्या नमाजसाठी मोठ्यासंख्येने जमा झाले होते. तेव्हा हा स्फोट झाला आहे. अद्यापपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली नाही. तालिबानचा कट्टर प्रतिस्पर्धी इस्लामिक स्टेट गटाने हा हल्ला केला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आत्मघातकी हल्लेखोर हा नमाजसाठी आलेल्यांच्या गर्दीत सहभागी होवून आला असण्याची शक्यता आहे. तसेच, मी आमच्या शिया बांधवांना आश्वासन देतो की तालिबान त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सज्ज आहे. तपास सुरू असल्याचे कुंदुज प्रांताचे पोलीस अधिकारी दोस्त मोहम्मद ओबैदा यांनी सांगितले. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये कब्जा केल्यापासून ‘आयएसआयएल’शी निगडीत दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत.


 
 
 

Comments


bottom of page