top of page

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान पाच जण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश

मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान पाच मुलं समुद्रात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. वर्सोवा जेट्टी येथे रविवारी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरलेले पाच जण समुद्रात बुडाले आहेत. त्यापैकी, दोन मुलांना वाचवण्यात यश आले असून ३ जण अद्याप बेपत्ता आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) याबाबतची माहिती दिली आहे.

ree

समुद्रात बुडालेल्या पाच जणांपैकी दोघांना स्थानिकांनी वाचवलं आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर उर्वरित तिघांचा मुंबई अग्निशमन दल शोध घेत आहे. बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. बीएमसीने याबाबतचं ट्विट केलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page