top of page

पुन्हा राडा ! शिवसेना भवनानंतर आता सिंधुदुर्गमध्ये सेना-भाजप समोरा समोर

सिंधुदुर्ग: मुंबईत शिवसेना भवनाबाहेर शिवसेना भाजपमध्ये झालेल्या राड्याला वाद थंडावत असतानाच आता सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

ree

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) , तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.


 
 
 

Comments


bottom of page