top of page

Video : गोमूत्राचे सेवन करून कोरोनाला हरवता येईल... ; भाजपा आमदारानं केला दावा !

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृतांचा वाढणारा आकडा ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. लसीकरणामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाला हरविण्यासाठी गोमूत्र हा पर्याय असल्याचा दावा भाजपाच्या एका आमदाराकडून करण्यात आला आहे. “ गोमूत्राचे नियमित सेवन केल्यानं कोरोनाला हरवता येणं शक्य आहे”, असा दावा उत्तर प्रदेशच्या बैरिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी केला आहे. सुरेंद्रसिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी हा दावा केला आहे.

ree

या व्हिडिओमध्ये सुरेंद्रसिंह स्वत: गोमूत्र पिताना दिसत आहेत. तसेच, गोमूत्राचे सेवन कसे केलं पाहिजे हे सांगतानाच त्यांनी “फक्त आणि फक्त गोमूत्रच कोरोनाला नियंत्रणात आणू शकेल”, असा दावा केला आहे. फक्त कोरोनाच नाही, तर इतर कोणत्याही आजारांवर गोमूत्र गुणकारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

भाजपाचे बुलंदशहरचे आमदार देवंद्रसिंह लोधी यांनी देखील असाच दावा केला होता “गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि करोनासारखे आजार होणार नाहीत. गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते”, असं त्यांचं म्हणणं आहे.


 
 
 

Comments


bottom of page