top of page

महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून ... ; भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य


कर्नाटकमध्ये 'हिजाब' वरून वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपाच्या एका आमदारांनी महिलांच्या पोषाखाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. महिलांच्या पोशाखामुळे बलात्काराच्या घटना घडतात असा दावा या आमदार महोदयांनी केला आहे. मात्र, काही वेळातच आपल्या विधानामुळे वाद निर्माण होऊ शकतो, हे लक्षात येताच सारवासारव करत मी महिलांचा आदर करतो म्हणत दिलगिरी देखील व्यक्त केली.

ree

कर्नाटकमध्ये हिजाबवरून वाद सुरू असताना कर्नाटकमधलेच भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी हे विधान केलं आहे. प्रियांका गांधींनी महिलांनी काय परिधान करावं, हा त्यांचा अधिकार आहे, असं विधान केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी नवी दिल्लीत बोलताना रेणुकाचार्य यांनी हे विधान केलं आहे. “महाविद्यालये किंवा शाळांमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी गणवेश किंवा त्यांचं शरीर पूर्णपणे झाकलं जाईल असे कपडे घालायला हवेत. महिला परिधान करत असलेले काही कपडे पुरुषांना उत्तेजित करतात, त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. हे योग्य नाही. कारण महिलांना आपल्या देशात आदर आहे, आपण महिलांना माता मानतो”, असं विधान रेणुकाचार्य यांनी केलं आहे.

दरम्यान, आपल्या विधानावर वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात येताच रेणुकाचार्य यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “जर माझ्या विधानामुळे आपल्या भगिनी दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यासाठी नक्कीच माफी मागेन. मी महिलांचा आदर करतो”, असं ते म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page