top of page

VIDEO : चंद्रकांत पाटील यांच्यासह पडळकर, शेलार, बावनकुळे, राणेंनी ढोल ताशांच्या तालावर धरला ठेका

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चार राज्यात दणदणीत विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्रात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सर्वत्र जल्लोष केला जात आहे. गोव्यात भाजपने बहुमत मिळवल्यामुळे तेथील प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार समारंभ मुंबईत आयोजित करण्यात आला. यावेळी मुंबई भाजप कार्यालया बाहेर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यासह आशीष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर या नेत्यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत डान्स केला.

ree

गोवा विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई भाजपतर्फे आज त्यांचा जंगी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील भाजप कार्यालय परिसरात जणू एखादा सण, उत्सव असल्याचे स्वरुप आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी ढोल वाजवणाऱ्या कलाकाराकडून त्यांनी ढोल घेतला आणि तितक्याच उत्साहात ठेका धरला. हे पाहून इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही अधिकच उत्साह संचारला. भाजपचे शेकडो कार्यकर्ते आज भाजप कार्यालयासमोर जमले असून पक्षाचा ध्वज घेऊन त्यांनी आनंद साजरा केला.



 
 
 

Comments


bottom of page