top of page

... तर देशातील नागरिकांची मनं जिंकण्याचं अभियान

कार्यकर्त्यांनी भाजपला ताकद दिली आणि लोकांमध्ये संघटनेची शक्ती वाढविण्यामध्ये काम केले. त्यांचे जीवन, आचरण, प्रयत्नातून ते नागरिकांची मने जिंकण्याचे काम करत राहतात. असे असूनही दुर्दैवाची बाब अशी आहे की जर भाजपने निवडणूक जिंकली तर भाजपला निवडणूक जिंकणारी मशीन म्हंटलं जात. पण ‘भाजपा निवडणूक जिंकण्याचं मशीन नाही, तर देशातील नागरिकांची मनं जिंकण्याचं अभियान आहे,’ असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. भाजपाच्या ४१व्या स्थापना दिनानिमित्त आज पंतप्रधान मोदी यांनी देशातील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

ree

यावेळी मोदी यांनी भाजपा सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांची, योजनांची माहिती देतानाच मोदी यांनी शेतकरी आंदोलन, सुधारित नागरिकत्व कायद्यावरही भूमिका मांडली. मागील वर्षी कोरोनानं संपूर्ण देशसमोर अभूतपूर्व असं संकट उभं केलं होतं. तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी आपलं सुख-दुःख विसरून देशवासियांची सेवा केली. ‘सेवा हेच संघटन’ याचा संकल्प केला आणि त्यासाठी काम केलं असल्याचं मोदी यांनी सांगितलं.


 
 
 

Comments


bottom of page