top of page

Video: जंगल पार केल्यानंतर खुलणार ‘बिग बॉस’च्या घराचं दार

‘बिग बॉस ’ पुन्हा एकदा स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज झालाय. होस्ट सलमान खानला टीव्ही स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी मेकर्सनी कलर्स चॅनलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बिग बॉस १५’ चा प्रोमो नवा रिलीज केलाय. पण या प्रोमोमध्ये बिग बॉसचं घर गायब असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामूळे बिग बॉसच्या यंदाच्या सीजनमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मेकर्सनी केला असल्याचे दिसते.

प्रोमो पहा ....

यंदाच्या सीजनमध्ये बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याआधी जंगल पार करावं लागणार आहे. यात स्पर्धकांना वेगवेगळे चॅलेंज दिले जाणार आहेत. त्यामुळे बिग बॉसचा यंदाचा सीजन हा बरीच संकट आणि ट्विस्ट घेऊन येणार आहे. या प्रोमोमध्ये जो आवाज ऐकायला येतो तो एव्हरग्रीन रेखा यांचा आहे. त्यामूळे बिग बॉसच्या यंदाच्या सीजनसाठी चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.



 
 
 

Comments


bottom of page