top of page

एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस १६' चा विजेता; शिव ठाकरे उपविजेता

बिग बॉस च्या १६ व्या सीझनचा विजेता एम सी स्टॅन ठरला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली. देशातील सर्वाधिक लोकप्रिय रॅपर म्हणून एमसी स्टॅनच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये एमसी स्टॅनचा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तो बिग बॉस १६ चा विजेता होईल असे भाकित अनेकांनी वर्तवले होते.



 
 
 

Comments


bottom of page