top of page

आरे कॉलनी परिसरातील "तो" बिबटया अखेर जेरबंद

आरे कॉलनी व आसपासच्या परिसरामध्ये याआधी अनेकदा बिबट्याचं स्थानिकांना दर्शन झालं आहे. या बिबट्याने आरे कॉलनीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेवर झडप घातल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली. आज पहाटे दहशत माजविणारा हा बिबटया वन विभागाने लावलेल्या सापळ्यात अडकला असून या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा बिबट्या त्याच्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकल्याचं समजल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर हा बिबट्या लोकांवर हल्ले करत असे. बुधवारी या बिबट्याने आरे कॉलनीमध्ये एका ५५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणावर देखील बिबट्याचा हल्ला केला होता.

 
 
 

Comments


bottom of page