top of page

भुशी धरण परिसरात नाकाबंदी; पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जमावबंदी

पुणे : पावसाळा सुरू झाल्यानं जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होऊ लागली आहे. वीकेण्ड एन्जॉय करण्यासाठी अनेक पर्यटक सिहंगड, खडकवासला, लोणावळा, खंडाळा तसेच आसपासच्या किल्ल्यावर येत आहेत. विकेंड लॉकडाऊन असूनही पर्यटन स्थळी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने पर्यटनस्थळांच्या ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आलं असून, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.

ree

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. धबधब्यांच्या ठिकाणापासून एक किलोमीटरच्या परिसरात वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना याठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.



 
 
 

Comments


bottom of page