top of page

... अन् लग्न सोहळा सुरु असताना लागली आग; अनेक वाहने जळून खाक

भिवंडी : शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवळपास दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमनदलाला यश आले. या आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळून खाक झाली.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी मॅरेज हॉलमध्ये रविवारी रात्री लग्नसमारंभ सुरू होता. यादरम्यान पार्किंगच्या मोकळ्या जागेत फटाके फोडण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करताना अचानक मंडपाला आग लागली. हळूहळू ही आग पसरून पार्किंगमधील वाहनांना लागली. या आगीत सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.


 
 
 

Comments


bottom of page