top of page

'जीव झाला येडापिसा' मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचं निधन

'जीव झाला येडापिसा' मालिकेत भावेंची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे 19 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत जोशी यांनी जवळपास दोन दशकं नाटक, सिनेमा आणि मालिकेत काम केलं. नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, तेंडल्या, लायब्ररी, बालगंधर्व सारख्या सिनेमात काम केलं आहे. त्याचप्रमाणे रात्रीस खेळ चाले मालिकेतही ते झळकले होते. 'जीव झाला येडा पिसा' या मालिकेत हेमंत जोशी यांचा सहकलाकार रोहित हळदीकर याने पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी दिली.

ree

कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडापिसा' या मालिकेतील हेमंत जोशी यांची भावे ही भूमिका अतिशय गाजली. चिन्मयी राघवन या मालिकेत आत्याबाईची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या पी.ए. ची भावेंची भूमिका हेमंत जोशी साकारत होते. ते अत्यंत दिलखुलास स्वभावाचे होते. सेटवर ते नेहमी हसत खेळत असायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या सह कलाकारांना विश्वासचं बसत नाहीय.



 
 
 

Comments


bottom of page