top of page

भारतनाना माफ करा…. सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी पराभव केला.मात्र, ही निवडणूक भाजपाने पैशाच्या जीवावर जिंकली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आ. अमोल मिटकरी भाजपवर निशाणा साधला.


ree

“भारतनाना माफ करा तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले”, असं ट्विट करत मिटकरी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.


 
 
 

Comments


bottom of page