top of page

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मारली बाजी

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाचं लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ५८ पैकी सर्वाधिक ३६ जागा जिंकून भाजपनं महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला. भाजपच्या या यशामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे.

ree

पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलं. एमआयएमनेही बेळगावमध्ये एक जागा जिंकत आपलं खातं उघडलं. तर १० जागांवर अपक्षांनी बाजी मारली.


गेल्या दोन वषार्पासून रखडलेल्या या निवडणुकीसाठी शुक्रवारी ५०.४१ टक्के इतकं मतदान झालं होतं.


 
 
 

Comments


bottom of page