top of page

पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; महिला दरीत कोसळली

पुणे : राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांची एकच धावपळ सुरू झाली. या धावपळीत गडाच्या बुरुजावरुन एक महिला थेट दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राजगड किल्ल्याच्या सुवेळा माचीवर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगड किल्ल्यावर काही पर्यटक शनिवारी पर्यटनासाठी गेले होते. याच दरम्यान मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याने पर्यटकांची धावपळ सुरू झाली. यावेळी रोहिणी वराट ( रा. वाकड, पुणे) यांचा पाय घसरला आणि त्या १०० फूट खोल दरीत कोसळल्या. पर्यटक महिला दरीत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. रोहिणी यांच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे.त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.



 
 
 

Comments


bottom of page