top of page

२०० पर्यटकांवर मधमाश्यांनी केला हल्ला

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या जवळपास २०० पर्यटकांना मधमाश्यांनी चावा घेतल्याची घटना घडली. शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिराजवळ रविवारी (दि. 13) दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान ही घटना घडली आहे एका जागरूक पर्यटकाने १०० नंबरवर या हल्ल्याबाबत कळविले. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले . या हल्ल्यात जखमी झालेल्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले,

सुटीचा दिवस असल्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर राज्यभरातून सुमारे ५०० पर्यटक आले होते. दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या किमान तीन मधमाशांच्या पोळ्यांमधून मधमाशांचे थवे अचानक बाहेर आले आणि सुमारे २०० पर्यटकांवर अचानक हल्ला केला. मधमाश्यांची संख्या वाढताच पर्यटकांनी गडावरून खाली येण्यास सुरुवात केली. मात्र, या माश्यांनी वाहनतळापर्यंत त्यांची पाठ सोडली नाही.



 
 
 

Comments


bottom of page