top of page

कृषिमंत्र्यानी घेतली घरपोच कोरोना लस...

देशभरात सध्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यानुसार १ मार्चपासून अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी रुग्णालयांमध्ये रांगेत उभे असल्याचं दिसून येत असताना कर्नाटकच्या एका मंत्रीमहोदयांनी मात्र थेट घरपोच कोरोनाची लस घेतली आहे. याची माहिती स्वतः मंत्रीमहोदयांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत नागरिकांना आवाहनही केले.

ree

कर्नाटकचे कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी मंगळवारी सकाळी फोटो ट्वीट करत त्यांनी नागरिकांना लसीकरणाला न घाबरण्याचा सल्ला देखील दिला. “आज माझ्या हिरेकरूर येथील घरी माझ्या पत्नीसोबत मी सरकारी डॉक्टरांकडून कोरोनाची लस घेतली आहे. अनेक देशांकडून भारतीय लशीचं कौतुक होत असताना काहीजण लशीबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. माझं लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी लसीकरणाचा प्रोटोकॉल पाळून लस घ्या आणि कोरोनामुक्त भारतासाठी हातभार लावा”, असंही त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल केंद्रीय आरोग्य विभागाने घेतली असून यासंदर्भात कर्नाटक सरकारकडून अहवाल मागवला आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे आधी प्रोटोकॉलच्या विरुद्ध जाऊन घरीच लस घेणे आणि त्यानंतर ट्वीट करून ते जगजाहीर करणे कर्नाटकच्या या कृषीमंत्र्यांना चांगलचं भोवण्याची शक्यता आहे.

 
 
 

Comments


bottom of page