top of page

बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय

बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने दारूण पराभव केला आहे. बांगलादेशने या विजयासह मालिका २-० ने जिंकून इतिहास घडवला आहे. पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशने 4 विकेट्स गमावून 56 ओव्हरमध्ये सामना जिंकला. बांगलादेशचा हा पाकिस्तानमध्ये पहिलाच मालिका विजय ठरला.

दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद २७४ धावा झाले. तर बांगलादेशला फक्त २६२ धावा करता आल्या. बांगलादेशकडून लिटन दासने १३८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर मेहदी हसनने ७८ धावांची निर्णायक खेळी केली. १२ धावांची आघाडी घेत पाकिस्तानने आपला दुसरा डाव सुरू केला. पण त्यांचा दुसरा डाव १७२ धावांवर आटोपला. बांगलादेशला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान मिळाले. ते बांगलादेशने ६ विकेट्स राखत सहज गाठले.आणि मालिका २-० ने जिंकून इतिहास घडवला.

コメント


bottom of page