top of page

Video: मंदिरात चेंगराचेंगरी; २ भाविकांचा मृत्यू

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उत्तर प्रदेशमधील मथुरेतील ‘बांके बिहार’ मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत २ भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे १.५५ वाजता ही घटना घडली.

ree

जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वर्षातून एकदा होणाऱ्या मंगला आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली.

मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरातील गर्दी लक्षात घेता सणांच्या दिवशी मंदिरांसह ठिकठाकाणी अधिक कडक व्यवस्था करण्यात याव्यात जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील असे निर्देशही मुख्यमंत्री योगींनी गृह विभागाला दिले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page