top of page

भाजपा का बाबा बंगाली!, चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण.... जटिल समस्याका थाली बजाके इलाज...

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका

मुंबई: पश्चिम बंगाल भाजपने एक ट्विट करून सत्तेत येताच पश्चिम बंगालमधील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. इंग्रजीत हे ट्विट करतानाच मोदींचा फोटोही ट्विट केला आहे. भाजपच्या या ट्विटला रिट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे.


भाजपा का बाबा बंगाली!

चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, किया कराया? तुरन्त काट! पोलिटिकल दुश्मन से छुटकारा, इलेक्शन में धोखा, गठबंधन में चोट-निसंकोच संपर्क करें, पार्टी में अनबन? किसानों कि कर्जामुक्ती, आंदोलन यात्रा में रुकावट, जटिल समस्याका थाली बजाके इलाज, गोल्ड मेडालिस्ट (वाराणसी), असं ट्विट करत राष्ट्रवादीने पंतप्रधान मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या या ट्विटमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सत्तेत आल्यावर सर्वांना कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी एका रॅलीत ही घोषणा केलाी होती. त्यानंतर भाजपनेही सर्वांना मोफत कोरोनाची लस देण्याचं जाहीर केलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page