top of page

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू

भरधाव ट्रक आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. छत्तीगडच्या बालोदाबाजार जिल्ह्यातील भाटापारा परिसरात हा अपघात झाला. अपघाताची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गंभीर जखमी झालेल्या १० जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बालोदा बाजार जिल्ह्यातील साहू कुटुंबातील सदस्य एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्जुनी येथून खिलोरा गावात गेले होते. तेथून कार्यक्रम आटोपून मध्यरात्री परतत असताना, खमारिया परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की पिकअपचा चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन लहान बालकांचा देखील समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.


 
 
 

Comments


bottom of page