top of page

राज्यातील "या" कारागृहात भाजीवरून झाली कैद्यांत हाणामारी

जास्त भाजी मागूनही ती दिली गेली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या ४ कैद्यांनी जेवन वाटप करणाऱ्या कैद्यास मारहाण केल्याची घटना घडली. भंडारा जिल्हा कारागृह वर्ग – १ मध्ये शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ree

जिल्हा कारागृहात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास देवेंद्र राऊत हे बॅरेक जबाबदार म्हणून भोजन वाटप करीत होते. यावेळी शेख रफिक शेख रहेमान याने जास्त भाजी मागितली. देवेंद्र राऊत याने जास्तीची भाजी देण्यास मनाई केली. यावरून वाद होऊन ४ कैद्यांनी दुसऱ्या कैद्याला हातबुक्क्या, लाथा आणि दगडाने मारहाण केली. शेख रफिक शेख रहेमान, महेश आगाशे, मोहम्मद अफरोज शेख, राहुल पडोळे या कैद्यांनी देवेंद्र सुखदेव राऊत (३५) या कैद्याला मारहाण केली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.


 
 
 

Comments


bottom of page