top of page

मुलानेच केली वडीलांची हत्या

औरंगाबाद : गंगापुर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे मुलानेच वडीलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आईच्या आत्महत्येला वडीलच जबाबदार असल्याचा राग मनात ठेवून मुलाने टोकाचं पाऊल उचलत जन्मदात्या वडीलांची लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हत्या केली. वाळूज पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडूबाळ सोनवणे असे मयत वडिलांचे नाव आहे तर अनिल सोनवणे असे आरोपी मुलाचे नाव आहे.

ree

दहा वर्षापूर्वी कडुबाळ सोनवणे यांच्या पत्नीने घरगुती वादातून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून ते अनिल (२२) आणि सुनील (२८) या दोन मुलांसह राहत होते. मोठा मुलगा सुनील एका हॉटेलमध्ये काम करतो, तर धाकटा अनिल घरीच असायचा. अनिल आईच्या आत्महत्येला वडीलच जबाबदार असल्याचा राग मनात ठेवून वडिलांसोबत नेहमीच वाद घालायचा. शनिवारी जेवण्यास नीट दिले नाही या कारणावरून वडिलांसोबत अनिलचा वाद झाला. रात्री वडील घराबाहेर झोपले असता अनिल रागारागात त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागला. अनिल बराच वेळ आपल्या वडीलांना लाथाबुक्क्यांनी मारत होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अनिलला ताब्यात घेतलं. याबाबत मोठा भाऊ सुनील सोनवणे याने फिर्यादी दिली. त्यानुसार आरोपी अनिलविरोधात वाळूज पोलीस स्थानकामध्ये कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.



वडिलांमुळे माझ्या आईने दहा-बारा वर्षांपूर्वी जाळून घेऊन आत्महत्या केली होती. आताही ते मला नीट जेवण देत नाहीत. शनिवारी या कारणावरुन दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचा वाद झाला. त्यामुळे वडील झोपेत असताना त्यांचे पोट, छाती आणि गुप्तांगावर लाथा मारुन आपण त्यांना जीवे ठार मारले, अशी कबुली आरोपी मुलगा अनिल सोनवणे याने दिली.


 
 
 

Comments


bottom of page