top of page

अस्वलांच्या हल्ल्यात ४ महिला गंभीर जखमी

गडचिरोली : तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर अचानक अस्वलांनी हल्ला केल्याने ४ महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवार (दि.७) सकाळी कुरखेडा तालुक्यातील कोहका क्षेत्रातील जंगलात घडली. सीमा टेकाम (वय २१), लता मडावी (वय ३५), पल्लवी टेकाम (वय २५) व रमशीला टेकाम (वय ३८, सर्व रा. दादापूर ) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

सध्या तेंदूपाने तोडण्याचा हंगाम सुरु असल्याने दादापूर येथील महिला आणि पुरुष कोहका क्षेत्रातील जंगलात पहाटे गेले होते. तेंदूपाने तोडत असताना सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक ५ अस्वलांनी महिलांवर हल्ला चढविला. यात चार महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी तेंदूपाने तोडणारे नागरिक धावून आल्याने अस्वलांनी पळ काढला. त्यानंतर जखमींना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वनाधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.


 
 
 

Comments


bottom of page