top of page

"रावणा"ची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन

दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय मालिका "रामायण"मध्ये लंकाधीपती रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते आणि माजी खासदार अरविंद त्रिवेदी यांचे ५ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. दीर्घ काळापासून ते आजारी होते, काल ​​रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.

ree

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. त्यांची कारकीर्द गुजराती रंगभूमीपासून सुरू झाली. लोकप्रिय हिंदी मालिका 'रामायण'मुळे ते घराघरात पोहचले. त्यांनी सुमारे ३०० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.


त्यांनी गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये प्राईडही मिळवल. येथे त्यांनी 40 वर्षे योगदान दिले. त्रिवेदी यांनी गुजराती चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सात पुरस्कार जिंकले होते. २००२ मध्ये त्यांना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नामित केले आले.


 
 
 

Comments


bottom of page